बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे – विजय वडेट्टीवार

मुंबई | राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विरोध पक्ष भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर ओबीसी आरक्षणावरून मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार सातत्याने भाष्य करत असतात. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

मी राजीनामा दिल्याने जर प्रश्न सुटत असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षण जाण्याला काँग्रेस जबाबदार नाही तर भाजप जबाबदार आहे, अशी टीका देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात राजकीय पक्ष दुटप्पी भूमिका घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पाच जिल्ह्याच्या मुद्द्यावरून सध्या जे काही राजकारण सुरू आहे, ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यापलिकडे दुसरं काही नाही. महाराष्ट्रातील जनता निवडणुकीत योग्य तो निर्णय घेईल. त्यावरून कळेल कुणाची चूक आहे. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम विरोधकांनी करू नये, अशी टीका देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी बोलताना ओबीसी आरक्षण जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही पक्ष जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता’; चंद्रकांत पाटलांकडून दरेकरांची पाठराखण

‘…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं’; अण्णा हजारेंचा इशारा

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More