…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ
अहमदाबाद | इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा विकेटकिपर रिषभ पंतने दमदार शतक ठोकले. पंतच्या या शतकामुळे भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध आघाडी घेता आली आहे. रोहित शर्माने पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची एक छोटीशी मुलाखत घेतली. याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा रोहितने पंतला विचारले, तु विकेटच्या मागे सारखा काही ना काही बडबडत असतो, असे लोक म्हणतात.
यावर पंत म्हणाला, मी क्रिकेटचा आनंद घेत असतो. यांमुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढतो. माझा प्रयत्न असतो की कशाही पद्धतीने संघाला मदत झाली पाहिजे. डोक्यात फक्त तेच सुरु असते, असे रिषभ पंतने उत्तर दिले .
काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने पंतला त्याच्या शतकाबद्दल विचारले. तसेच तो विकेटकिपिंग करताना सारखा काही ना काही बडबडत असतो त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावर पंतने हे उत्तर दिले त्याने सर्वांची मने जिंकली.
दरम्यान, चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 146 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. तेव्हा पंतने सुंदरसह शतकी भागीदारी केली. या दोघांनी 113 धावा केल्या. त्यानंतर पंतने कसोटीमधील तिसरे शतक पूर्ण केले. पंतने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावा ठोकल्या
Batting approach 👌
Vital partnership 👏
Fearless mindset 😎@RishabhPant17 & @Sundarwashi5 chat up with @ImRo45 after their fine batting show on Day 2 of the 4th Test in Ahmedabad.👍👍 – By @RajalArora @Paytm #INDvENG #TeamIndiaFull interview 🎥👉 https://t.co/gTGTV2Vhpn pic.twitter.com/mog1gOTD2N
— BCCI (@BCCI) March 5, 2021
थोडक्यात बातम्या –
‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांची महाविकासआघाडीवर सडकून टीका
चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली
Comments are closed.