बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी भगवान विष्णूचा दहावा अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही”; पाहा व्हिडीओ

गांधीनगर | अनेकवेळा कर्मचारी ऑफिसला सुट्टीसाठी अचंबित करणारी कारणे देतात. मात्र अशातच गुजरात सरकारमधील एका अधिकाऱ्याने असंच काहीस कारण दिलं आहे. या अधिकाऱ्याने आपण चक्क भगवान विष्णूचा अवतार असल्याचा दावा करत ऑफिसला येऊ शकणार नसल्याचं म्हटलं आहे. रमेशचंद्र फेफर असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. सरदार सरोवर पुनर्वास एजन्सीचे यांना कारणे द्या नोटीस पाठवण्यात आली होती.

या नोटीसला उत्तर देताना, माझ्या साधनेमुळे देशात चांगला पाऊस पडत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी विष्णूचा दहावा अवतार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी हे सिद्ध करून दाखवेल. मी मार्च 2010 ला ऑफिसमध्ये असताना मला जाणवलं की मी  भगवान विष्णू यांचा अवतार कल्की आहे. तेव्हापासून माझ्याकडे दिव्य शक्ती असल्याचं रमेशचंद्र फेफर यांनी म्हटलं आहे.

फेफर हे गेल्या आठ महिन्यांमध्ये फक्त सोळा दिवस कामावर हजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.  यावर त्यांनी असं कारण दिलं आह. इतकंच नाही तर मी ऑफिसमध्ये बसून तपश्चर्या करू शकत नाही. जगाच्या अंत:करणात बदल करण्यासाठी आपण घरात तपश्चर्या करत असल्याचं फेफर म्हणाले.

दरम्यान, माझ्या साधणेमुळे देशात गेल्या 19 वर्षांपासून पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे. त्यामुळे आता कार्यालयाने ठरवायचं की मला ऑफिसमध्ये बसवून वेळ वाया घालवणं महत्त्वाचं आहे की देशाला सुक्या दुष्काळापासून वाचवणं?, असंही फेफर यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

महिला क्रिकेटपटूच्या मदतीला विराट कोहली धावला; केली ‘इतक्या’ लाखांची मदत

मुल होत नाही म्हणून पतीने उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने अधिक

अंधश्रद्धेचा कहर ! कोरोना रोखण्यासाठी 7 लाखांची पुजा, खंडीभर बोकडांचे बळी अन्…

गेले 27 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या ‘या’ मालिकेच्या नव्या पर्वाचं ट्रेलर प्रदर्शित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More