बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आता जम्मू काश्मीरमध्ये स्वस्थ बसून चालणार नाही’; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

नागपूर | जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सेना नाही तर मानवी अधिकाराच्या नावावर भारतीय सेनेला लक्ष केले जात आहे. 370 कलमानंतर व्यवस्था बदलली पण तरी हे संकट अद्याप टळलं नाही. हे खूप दुख:दायक आहे. त्यामुळं आपण स्वस्थ राहून चालणार नाही, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारला दिलाय.

आधुनिक लदाखचे निर्माता एकोणिसावे कुशोक बकुला आणि जम्मू आणि काश्मीर इतिहासिक परिपेक्ष में धारा 370 के संशोधन के उपरांत या दोन पुस्तकांचे प्रकाशन मोहन भागवत यांच्याहस्ते प्रकाशन पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना भागवत यांना सल्ला दिला आहे.

370 कलमाच्या आडून राजकारणी मोठा भ्रष्टाचार करत होते पण 370 च्या नंतर परिस्थिती सुधारली आहे. आता कसलाही भ्रष्टाचार नाही तसेच भ्रष्टाचार थांबला आहे. काश्मीरमध्ये 370 नंतर तीन प्रवाह पहायला मिळत आहेत. एक काश्मिरी पंडितांना स्थायिक होऊ नये म्हणून आतंकवादाचे समर्थन करणारा एक मत प्रवाह आहे. पाकिस्तान समर्थक फूट पाडण्याचा प्रयत्न करणारा एक प्रवाह आहे, असं भागवत म्हणाले.

दरम्यान, काहीजण विकासाचं समर्थन करणारा वर्ग आहे. 370 व्यवस्था बदलली पण मात्र अद्याप संकट टळलं नाही. आपण स्वस्थ बसून चालणार नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“साहेब! जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

“तुमच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटका, राज्याला संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री लाभला”

धोनी म्हणतो,”मी पुन्हा येईल…, मी कुठं आयपीएल सोडलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More