बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दसरा मेळावा भगवानगडावर पार पडत होता. पण मागील तीन वर्षापासून हा मेळावा आता बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव घाटमध्ये पार पडत आहे. बीडच्या भगवान भक्तीगडावर शुक्रवारी दसरा मेळावा संपन्न झाला आहे. या दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केलं.

कोरोना काळामध्ये लोकांना उर्जा देण्यासाठी हा मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्यासाठी किती लोक येणार आहेत? मी काय सांगू? लोक एवढ्या मोठ्या संख्येने आले आहेत. मला वाटतंय साक्षात भगवान श्रीकृष्ण आले आहेत, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

मी माझ्या पक्षाला सांगू इच्छित आहे, की सरकार कधी पडणार आहे आणि त्याच्या तारखा देणं बंद करा. आपल्या पक्षातील प्रत्येक जण उठून सांगतो की, सरकार पडणार आहे आणि सत्ताधारी पक्षांतील लोक सांगत आहेत की, सरकार पाच वर्ष टिकणार आहे. मात्र सरकार पडणार आहे की टिकणार आहे, या चर्चांमधून तुम्ही बाहेर येणार आहात का? असा सवाल देखील त्यांनी भाजपला विचारला आहे.

दरम्यान, सरकार पडण्याचा अंदाज बांधण्यापेक्षा जनतेच्या हिताकडे लक्ष द्या. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गळ्यात हार आणि डोक्यावर फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा देखील त्यांनी यावेळी घेतली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘घरचे सांगायचे मुलगा डायरेक्टर आहे, म्हणून…’; अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा

‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत रामदास कदम यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, म्हणाले…

IPL 2021चा चॅम्पियन कोण? फायनलमध्ये ‘या’ 8 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More