बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत

मुंबई | आपल्या खास आणि आक्रमक शैलीसाठी खासदार संजय राऊत यांना ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून राऊत यांची ओळख आहे. राजकारणातील चालू घडामोडींबद्दल राऊत हे रोखठोक वक्तव्य करत असतात. असंच एक वक्तव्य राऊत यांनी आता केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जयपुरमध्ये आमदार आणि मंत्री यांच्या राजकीय दुख: बद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, मला मंत्री व्हायची हौस नाही. मी खासदार सुद्धा मनात नसताना झालो. आता मंत्री व्हायचं म्हणलं तर मला सामनाचं काम  सोडावं लागेल, असं राऊत म्हणाले.

सामनातून सतत राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडींबद्दल लिहिलं जातं. संजय राऊत सध्या सामनाद्वारे आपल्या विरोधकांना लक्ष करताना पहायला मिळत असतात. राऊत यांनी यावेळी त्यांच्या आणि राहूल गांधी यांच्यातील मैत्रीबद्दल सुद्धा आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या जयपूरमधील आमदार आणि खासदार यांच्या बद्दलच्या वक्तव्याने राजकारणात विविध चर्चा रंगल्या आहेत. नितीन गडकरी हे अगदी स्पष्ट बोलतात, असंही राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

“72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More