बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मी माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव लिहिलंय’; भाजपच्या माजी खासदाराने सांगितलं गुपित

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वर्ध्यातील एका नगरपालिकेच्या विविध कामांच्या ई-भूमिपूजनाच्या कामासाठी उपस्थित होते. कामाचे ई-भूमीपूजन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार दत्ता मेघे देखील हजर होते. कार्यक्रमात बोलताना मेघे यांनी त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

मी माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं आहे, असं वक्तव्य मेघेंनी केलं आहे. गडकरी हे आमच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत. मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये यासाठी मी गडकरींचं नाव त्यात लिहिलंय, असंही ते म्हणाले. आपल्या देशातील नेतृत्व देशाचा विकास व्हावा यासाठी दिवस-रात्र काम करत झटत आहे, असे गौरव उद्गार देखील मेघे यांनी गडकरींबद्दल बोलताना काढले.

गडकरी हे देशातील प्रत्येक  राज्यामध्ये जाऊन काम करत आहेत, असं मेघे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंचावर दत्ता मेघे यांच्या बाजूला बसले होते. यादरम्यान भाषण करताना मेघे यांनी यांनी गडकरींचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला नितीन गडकरींबरोबरच आमदार रामदास आंबटकर, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याबरोबरच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

दोघात तिसरा आता सगळं विसरा! महिलेला चुंबन देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 882 रूग्ण

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! प्रियंका गांधींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् चक्क डेव्हिड वार्नरने केला रोहित शर्मावर चोरीचा आरोप!

‘जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More