बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली; हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा

इंदापूर| सध्या राज्याचं राजकारण विविध मुद्द्यांवरून चांगलंच तापलेलं आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं तयारी चालू केली आहे. विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळालेलं होतं. आता याच पक्षांतराबाबत राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हर्षवर्धन पाटील हे काॅंग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्याचे सहकार मंत्री होते. 2019 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काॅंग्रेसनं तिकीट नाकारल्यानं मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये आल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यापासून हर्षवर्धन पाटील सध्या एकाहून एक नवनविन स्फोटक वक्तव्य करत आहेत. परिणामी राज्याचं राजकारण पाटील यांच्याभोवती फिरत आहे. पाटील यांना राज्यातील काॅंग्रेसच्या मातब्बर नेत्यामंध्ये मानलं जात होतं. पण त्यांच्या पक्षांतराचं खापर त्यांनी आता काॅंग्रेसवर फोडल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच संचालक मंडळ यावेळी बिनविरोध निवडण्यात आल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर भागातील सर्वाचं आभार मानलं आहे.

थोडक्यात बातम्या 

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीला ईडीने बजावलं समन्स

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More