Top News पुणे महाराष्ट्र

आता गुन्हेगारांची खैर नाही!; …तर त्या फोनवाल्याला मी बघतो- अजित पवार

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. हीच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील पोलिसांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेनुसार, शहर पोलीस दलासाठी ‘हेल्थ ३६५’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. काल शुक्रवारी या उपक्रमाच्या अंतर्गत पोलिसांना स्मार्ट वॉच आणि सायकलींचं वाटप अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती करताना घाईगडबड झाली. पुरेशी साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलं नाही. पोलीस आयुक्तालयासाठी जागा, साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र, चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली, हा केविलवाणा प्रकार आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते, पोलिसांच्या मनोबलावरही परिणाम होतो. अशा पोलिसांच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणाची गरज असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!

‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या