बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलं भारतीय संघाचा मेन्टाॅर”

मुंबई | येत्या 17 ऑक्टोबरला टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघाचा मार्गदर्शक अर्थात मेंटॉर म्हणून निवड करण्यात आली आहे. मेंटॉर म्हणून धोनीची निवडक का करण्यात आली? यासंदर्भात बीसीसीआयकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

महेंद्रसिंग धोनी हा एक महान कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा विजय मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वात 2007 सालचा टी-ट्वेन्टी वर्ल्ड कप तसेच 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी देखील जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिकूल परिस्थितीत संघाला यश मिळवून दिलंय. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी जर संघाचा मेंटॉर असेल तर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला निश्चित फायदा होईल, असं बीसीसीआयचे अध्यक्ष अरूण धूमल यांनी म्हटलं आहे.

धोनीचा मेंटॉर म्हणून निवड करणे हा विराट कोहलीला मोठा इशारा असल्याचं मानलं जातंय. महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा विजय मिळवला आहे. परंतु, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदाही आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवता आलेला नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात 2019 मध्ये विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीचा आतापर्यंतचा इतिहास पाहता त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. तसेच येणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवता येईल, अशी अपेक्षा बीसीसीआयला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये कामगिरी करेल, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

“शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी”

“हे तर भाजपचं षडयंत्र, कारवाईची माहिती भाजप नेत्यांनाच समजतेच कशी?”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More