बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले’; पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

नवी दिल्ली | राज्यातील अनेक नेते सध्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची कामानिमित्त भेट घेत आहेत. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. बीड जिल्ह्यातील विकास कामांबाबत नितीन गडकरींना भेटले, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांच्यासमवेत बीड जिल्हाच्या भाजप नेत्या आणि खासदार प्रीतम मुंडे यांनीही नितीन गडकरींची भेट घेतली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, बीड जिल्ह्यातील विकास कामांबाबत चर्चा झाली, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

माझ्या जिल्ह्यातील विकास कामांसाठी गडकरी साहेबांना भेटले. खासदार प्रीतम मुंडे आमच्या जिल्ह्यातील आमदार माधुरी मिसाळ या सोबत होत्या. विकासकामांचा विषय होता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले आहेत.  नितीन गडकरी यांनी आमच्या विकासकामांना भरभरून दिलं आहे.  जे काही छोटे विषय आहेत आणि प्रलंबित विषय आहेत ते त्यांनी लगेच तात्काळ जागच्या जागी मार्गी लावले, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. ही गडकरी साहेबांची पद्धत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरींची अचानक भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नितीन गडकरी आणि मुंडे भगिनी यांची एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. पंकजा यांना माध्यमांनी याभेटीत कोणती राजकीय चर्चा झाली का? असा प्रश्न केला होता. त्यावर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

‘आज गोपीनाथराव असते तर त्यांनी…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

‘मला विरोध करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे’; उदयनराजेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More