बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | काल राज्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार म्हणाले आहेत. आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असंही शरद पवार म्हणाले आहेत. सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वानी एकमताने मान्य केलं होतं. असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

महाविकास आघाडीच सरकार नेतृत्व शिवसेनेकडेच राहणार. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. केंद्र सरकारने कितीही छापे टाकावेत, हे सरकार झुकणार नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, ठाकरे सरकार अस्थिर करण्याची केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जातोय. मी पुन्हा येणारे अस्वस्थ झालेत, असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

फडणवीस-मुंडे वाद पुन्हा शिगेला???; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांनी सोडली पत्रकार परिषद

…जेव्हा ‘द वाॅल’ म्हणतो, “तो माझ्यासाठी काही अभिमानाचा क्षण नव्हता”

पुढील 48 तास धोधो पाऊस; ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘मलिकांना मिरच्या का झोंबल्यात?…’ नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेलांचं प्रत्युत्तर

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More