बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करतीये- पंकजा मुंडे

परळी | मी परळीची आहे परळीची कार्यकर्ता आहे. त्यामुळे परळीत रॅला काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर फायद्याचं आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा मदत तिथे पोहोचावी, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी परळीत मदत फेरी काढली. यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारकडून मदत मिळतेच आहे तरीही आपली मदत तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणं आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

दरम्यान, आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन!

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

“केंद्रातील मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही”

राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More