बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून सांगतो चड्डीत राहायचं’; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई | जनआशीर्वाद यात्रेपासून सुरू झालेला वाद अजून थांबलेला दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख कामांबाबत नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा घेण्यात येत आहे. पण महाराष्ट्रात या यात्रेच्या निमित्ताने सुरू झालेला गोंधळ अजून चालुचं असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सामनाची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे. काही ‘आडनाव’ ऐकली, की शिवसेना लगेच गोड होते. आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात. तेव्हा युतीची आठवण येते. मग सगळं एकदम गोड गोड. म्हणून नेहमी सांगतो चड्डीत राहायचं, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात दरी निर्माण करताना दिसत आहे. नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आणि शिवसेना यांच्यात रंगलेलं शाब्दिक युद्ध अजूनही चालुचं आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक हल्ला केला आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. बैठकीनंतर उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात गुप्त चर्चा झाल्याच्या आधारावर नितेश राणे यांनी शिवसेनेवर ही टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या  

…म्हणून शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या शेतात सोडल्या मेंढ्या, पाहा व्हिडीओ

यंदाही मिरवणुकीला बंदी; पुण्यात गणेशोत्सवासाठी ‘ही’ नियमावली लागू

समंथाने का हटवलं आपल्या नावासमोरील नवऱ्याचं आडनाव?, पाहा व्हिडीओ

एकाच सोसायटीमध्ये तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ ; पाहा व्हिडीओ

“आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More