Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

मुंबई | एका मुलाखतीत खडसेंना देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला ‘एकनाथ खडसे यांनी मला विलन ठरवलं’, असे फडणवीस म्हणाले होते. त्याच्या या वक्तव्यावर फडणवीसांमुळेच मला पक्ष सोडावा लागला, अशी भूमीका खडसेंनी मांडली.

त्यावेळी खडसे म्हणाले की, माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी माझं नेतृत्व करत होते, त्यामुळे त्यांनी माझा दोष स्वीकारला पाहिजे होता.

सभागृहात त्यांना बोलता आले नाही. सभागृहाच्या बाहेरही ते काही बोलू शकले नाही, म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांच नाव घ्यायला लागलं, असं खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांचा 23 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज 2 वाजता राष्ट्रवादीत आधिकृत प्रवेश होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मनसे नेते अमित ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, आरोपी गजाआड

‘…त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखं काहीच नव्हतं’; भाषणानंतर शिवसेनेचा मोदींना टोला

आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?

…म्हणून सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’- किरीट सोमय्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या