बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मी स्वत: अशोक चव्हाण यांचा जाहीर सत्कार करेन”

नांदेड | अतिवृष्टीमुळे मागील महिन्यात विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे पंचनामे न देता त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांनी सरकारकडे केली होती. अलिकडेच पीक विमा कंपनीशी करण्यात आलेल्या चुकीच्या कराराबाबत केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची जनतेची दिशाभूल केली आहे. तसेच राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जर तसं जमत नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा. असं केल्यावर मी स्वत: नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर त्यांचा जाहीर सत्कार करेन, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.

पीक विमा कंपन्यांचा राज्य सरकारसोबत करार करण्यात आला आहे. तो करार करताना राज्य सरकारने शेतकऱ्यांंची दिशाभूल करून चूकीच्या पद्धतीने करार केला आहे. या करारानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या यंत्रणेने केलेले पंचनामे पीक विमा कंपन्यांना मान्य नाहीत. त्यामुळे पीक विमा कपंनी मालक आणि राज्य सरकार गुलाम बनले आहे, असं बबनराव लोणीकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात पीक कंपन्यांना विमा देण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण या मुद्यांमुळे ढवळून निघालं आहे.

थोडक्यात बातम्या- 

प्रवरा ग्रामीण महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते होणार

“अंबानी आणि संघातील एका व्यक्तीने मला 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला”

मोठी बातमी! भीमा कोरेगाव प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More