अहमदनगर | खासदार सुजय विखे यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिल थकबाकीवरून महावितरणकडुन होत असलेल्या कारवाईविरोधात त्यांचे राजकीय विरोधक उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव न घेता आक्रमक टीका केली आहे. मी जर मंत्री असतो तर, शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत राजीनामा दिला असता, अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. राहूरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होेते.
आम्ही आत्तापर्यंत संघर्ष करून पदं मिळवली आहेत. आम्ही कधीच लॉटरी मागून मंत्री किंवा आमदार झालेलो नाही असंही ते यावेळी बोलताना म्हटले आहेत. जनतेच्या आशीर्वादाने नगर जिल्ह्यात यांना आमदारकी आणि मंत्रिपद मिळालं आहे.
जर मंत्र्यांच्याच मतदारसंघात हे जनतेला न्याय देऊ शकत नसतील तर अशा मंत्रिपदाचा काय उपयोग? असा प्रश्नही सुजय विखे यांनी उपस्थित केला आहे. आमच्या पक्षाची सत्ता असती तर हा प्रकार आम्ही कधीच घडू दिला नसता तसेच, अशा गोष्टी घडत असताना आम्ही काही करू शकलो नसतो तर मी थेट राजीनामा दिला असता, अशा शब्दात त्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका केली आहे.
आम्ही जनतेनं डोक्यावर घेतल्याने इथपर्यंत आलो आहोत आणि आम्ही जनतेसाठी आहोत, याचे भान आम्हाला असल्याचंही ते या ठिकाणी बोलताना म्हटले आहेत. सध्या वीज बिल वसुलीवरून विजेचा पुरवठा खंडित करण्याचा प्रकार महावितरणकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी आपले विरोधक तसेच मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“नाना पटोले फार हुशार आहेत, श्रेय घेण्यासाठी नाना पटोलेंची हुशारी”
‘…तर आम्ही एक मिनिटही बसणार नाही’; सभागृहात फडणवीस आक्रमक
‘पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी इतके कोटी रूपये घेतले’; शांता राठोडांचा मोठा गौप्यस्फोट-
शिवसेनेचा आणखी एक नेता भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांच्या त्या ट्विटने खळबळ
संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…
Comments are closed.