बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉसनं पगार न दिल्यामुळे पठ्ठ्यानं उचललं धक्कादायक पाऊल…, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. एका रात्रीत अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण व्हिडीओपासून तर काहीतरी धक्कादायक व्हिडीओपर्यंत व्हायरल होत असतं. अशातच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रागाच्या भरात जेसीबीच्या माध्यमातून ट्रकची नासधूस करत आहे. जेसीबीमध्ये बसून हा माणूस रांगेत उभ्या केलेल्या ट्रकची तोडफोड करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.

व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं हा व्हिडीओ शेअर करत बॉसनं पगार न दिल्यामुळे माणसानं असं कृत्य केलं आहे, असं कॅप्शन दिलंय. या माणसानं रागाच्या भरात मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान केलं आहे. या व्यक्तीचा कारनामा पाहून आसपासचे सगळेच स्तब्ध झालेले दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेक लोकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण कामाचे पैसे थकवल्यामळे तसेच भरपूर विनंती करुनही पैसे न भेटल्यामुळे जेसीबीतील माणसाने या ट्रकांची नासधूस करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

 

थोडक्यात बातम्या – 

“नेहरु असतानाच हिंदू मारले गेले, देवाचे आभार माना की RSSचा जन्म झाला”

…तर दर महिन्याला मिळेल दहा हजार पेन्शन; पती-पत्नीसाठी सरकारची बंपर योजना

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

“गरीब देश कोरोनाने चिरडलेत, लसीकरणासाठी त्यांना मदत करायलाच हवी”

टाइम्स मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दहशतवादी मुल्ला बरादरचा समावेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More