…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

मुंबई | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सामन्यात पर्दापण करणारा मयांक अग्रवालचं न्यूझीलंड दौऱ्यासाठी नाव घेण्यात आलं होतं, मात्र मयांक दुखापतग्रस्त असल्याने शुबमन गिलला राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे.

मयांकला झालेल्या दुखापतीमुळेच एकदिवसीय आणि टी-20 संघात पदार्पणाची त्याची संधी हुकली.

मयांकच्या अंगठ्याला दुखापत झाली असल्यामुळे तो रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात कर्नाटकच्या संघाकडून खेळू शकणार नाही.

दरम्यान, शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नसून तो न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. 19 वर्षाचा शुबमन गिलचा हा वर्षभरातील तिसरा न्यूझीलंड दौरा आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

-“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

-आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण

-शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

-“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”