Top News खेळ देश

‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर

Photo Credit-Facebook/ Ishan kishan

पटना | इंग्लंडचा संघ सध्या भारत दैऱ्यावर आहे. कसोटी मालिकेनंतर इंग्लंडसोबत 5 टी-20 सामने देखील खेळले जाणार आहेत. या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळणारे इशान किशन, सुर्यकुमार यादव आणि राजस्थान राॅयल्सकडून खेळणारा राहूल तेवतिया यांना टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे.

इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळाल्याची बातमी कळताच इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर झाले. ही बातमी सर्वप्रथम इशानच्या वहिनीला कळाली. बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती दिली होती. त्यानंतर लगेच इशानने फोन करून ही माहिती आईवडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना अश्रु अनावर झाले.

लहानपणापासून इशानला भारतासाठी खेळायचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. यासाठी त्याने खूप मेहनत केली होती. नववीत असताना त्याची परीक्षा आणि मॅच दोन्ही होत्या. परीक्षाला न आल्यास शाळेतून काढण्यात येईल असं शिक्षकांनी सांगितलं असताना देखील त्याने क्रिकेट खेळायचा निर्णय घेतला. यात त्याला त्याच्या वडिलांची मोलाची साथ लाभली.

दरम्यान, जोपर्यत इशान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत नाही तो पर्यत मी त्याची मॅच बघायला जाणार नाही, अस त्याच्या आईने सांगितलं होतं. इशान सध्या झारखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशानने मागील आयपीएल हंगामात धमाकेदार कामगिरी बजावली होती. एवढंच नाही तर, मुंबईला पाचव्यांदा आयपीएल ट्राॅफी जिंकवून देण्यात इशानची मोलाची भुमिका होती.

थोडक्यात बातम्या-

नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींची आज ट्रॅक्टर रॅली!

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

…पण माझ्या शेतकऱ्यांसाठी मोदींचे अश्रू निघत नाहीत- सुप्रिया सुळे

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या