बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…..म्हणून कम्प्युटर पदवीधरांना आली काॅंग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ

नवी दिल्ली | राजस्थानमधील संगणक पदवी धारक दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनल्याचं दिसत आहे.

संगणक शिक्षक या नियमित पदासाठी आधी अर्ज मागवण्यात येणार होते. मात्र सरकारच्या नवीन घोषणेनुसार ही पदं कॉन्ट्रॅक्टवर असणार आहे. यामुळे संगणक पदवीधारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. म्हणून काही युवा संगणक पदवीधर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन करत आहे. कॉन्ट्रॅक्टवरील ही पदं नियमित करण्यात यावी मागणीसाठी या पदवी धारकांनी राजस्थान सरकारपासून ते गांधी परिवारापर्यंत सर्वांना मागणी केली आहे.

आता राजस्थानमध्ये संगणक पदवी धारकांवर अन्याय होत असताना प्रियंका गांधी शांत का आहेत?, हा बेरोजगारांचा अपमान आहे, असं या संगणक पदवीधारकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, राजस्थान सरकारनं 2020-21 च्या अर्थसंकल्पात संगणक शिक्षक कॅडर तयार करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे संगणक पदवी धारकांना आनंद झाला होता. सरकारी नोकरी मिळणार म्हणून अनेकजण यासाठी तयारीला लागले होते. मात्र आता राजस्थान सरकारनं याबाबत नवीन घोषणा केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

माणूस दिसला की टोचा लस! लसीकरणासाठी ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी शक्कल

गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या ‘या’ नवीन मार्गदर्शक सूचना

‘भाजपमध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?’; अनिल देशमुख प्रकरणावरून राऊतांनी सुनावले खडेबोल

खुशखबर! सोनं दोन हजारांनी तर चांदी चार हजारांनी घसरली; वाचा ताजे दर

‘आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती’; थोरातांच्या लेकीचं पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More