Top News देश

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली | कोरोनाने सर्वात शक्तीशाली अमेरिकेसारख्या राष्ट्रातही थैमान घातलं होतं. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष होते. तेव्हा त्यांना परसिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. त्याकाळात ट्रम्प यांनी चीनवर केलेल्या टीकेमुळे आणि त्यांच्या इतर वादग्रस्त वक्तत्यामुळे ते चर्चेत राहिले. अशातच ट्रम्प यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे.

अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं कारण कोरोना संसर्ग होण ही एक सर्वात शक्तीशाली लस आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी ते बोलत होते.

कोरोनाची लस तयार करणं हे आमचं पहिलं उदिष्ट होतं. लस तयार करण्याला प्राधान्य असलं तरी जसजसा काळ लोटत होता त्याप्रमाणे अनेकांमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती तयार होत होती, असं ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेतील 15 टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे उत्तम (टेरिफिक) आहे. कारण संसग्र होणं हीच सर्वात शक्तीशाली लसं असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार

आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज

कोरोना लसीबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

“…तर भाजपला राज्यात 50 पेक्षा जास्त जिंकता लढवता येणार नाही”

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या