बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

कोलकाता | 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल जाहीर झाला. निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली होती. त्यानंतर अनेक जणांनी या हिंसाचाराची निंदा केली आहे. तर भाजप आणि तुणमूल काँग्रेस एकमेकांना या हिंसाचारासाठी जबाबदार ठरवत आहेत. यात आता बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. यात बोलताना तिला रडू देखील कोसळलं आहे.

आपण सर्वजण बघतोय की बंगालमधून खूप जास्त डिस्टर्ब करणाऱ्या बातम्या येत आहेत. याबाबत व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. खुलेआम बंगालमध्ये खून आणि बलात्कार होत आहेत. त्यातच आता घरला देखील जाळलं जात आहे. यावर कोणीही लिबरल माध्यमे काहीच बोलत नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा काहीही बोलबाला नाही. मला समजत नाहीय की ही लोकं आपल्या भारतासोबत काय करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू रक्त इतकं स्वस्त आहे का?, असा सवाल कंगणा राणावतने उपस्थित केला आहे.

बंगालमध्ये हिंसाचार होत आहे. रक्ताच्या नद्या वाहत आहेत. आपण का या देशद्रोहाना घाबरतो. आता देशद्रोही देश चालवणार का?, मला माहिती आपण खूप अडचणी सापडलो आहोत. या वेळी देशात राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे. जवाहरलाल नेहरुंनी देशात 12 वेळा राष्ट्रपती राजवट लावली. इंदिया गांधींनी 50 वेळा राष्ट्रपती राजवट लावली होती. तर मग आपण का घाबरत आहोत, असं देखील कंगणा म्हणाली.

दरम्यान, लवकरात लवकर हर थांबवलं पाहिजे आणि सरकारने लवकरात लवकर यावर कारवाई करावी, अशी मागणी कंगणा राणावतने केंद्र सरकारला केली आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

आईला कोरोना, बेड मिळेना, मात्र मुलगा आणि मुलीनं हार मानली नाही; एका धैर्याची कहाणी!

“हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे?, टाळी एका हाताने वाजत नाही”

शेजारील तरुणासोबत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचं समजल्यानंतर पतीने उचललं धक्कादायक पाऊल

हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएलचं यंदाचं पर्व रद्द, राजीव शुक्लांचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More