मुंबई | पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यावर अभिनेत्री कंगणा राणावतने रिहानाच्या ट्विटला समर्थन करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देणारे ट्विट केले होते. कंगणाने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवरही आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. यावरून ट्विटरने कंगणाचे ट्विट डिलीट केले होते. ट्विटरने कंगणाचे ते ट्विट हटवल्यानंतर कंगणा आक्रमक झाली असून तिने थेट ट्विटरलाच धमकी दिली आहे.
लक्षात ठेवा जेव्हा मी जाईन तेव्हा सर्वांना घेऊन जाईल. तुमच्या ट्विटरवर चीनच्या टिकटॉकसारखी बंदी आणे|ल, असा धमकीवजा इशारा कंगणाने ट्विटरला दिला आहे. यासंदर्भात कंगणाने ट्विट केलं आहे.
चीनच्या हातातली बाहुली असलेलं ट्विटर मला माझं अकाउंट निवंबित करण्याची धमकी देत आहे. मी कोणत्याही नियामांचं उल्लंघन केलेलं नाही, असंही कंगणाने म्हटलं आहे.
दरम्यान, कंगणाच्या या वक्तव्यावर ट्विटर काय पाऊल उचलतं म्हणजे कंगणाचं अकाउंट बॅन करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
China puppet twitter is threatening to suspend my account even though I did not violate any rules, remember jis din main jaungi tumko saath lekar jaungi, just like Chinese tik tok you will be banned as well @jack #ConspiracyAgainstlndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 4, 2021
थोडक्यात बातम्या-
‘अक्षयने लग्नाचं वचन देत माझा वापर केला आणि …’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप
महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान
सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?- देवेंद्र फडणवीस
सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा- बाळासाहेब थोरात
महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन