बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….. म्हणून करण जोहर पाठोपाठ शाहरूख खानच्याही चित्रपटातून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबई | अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यात मोठा वाद झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे  करण जोहरनं त्याची ‘दोस्ताना 2’ मधून हकालपट्टी केली होती. अशातच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसमधूनही कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

कार्तिक आर्यन हा किंग खानचे प्रोडक्शन रेड चिलीज अंतर्गत तयार होणारा फ्रैडी चित्रपटातून बाहेर पडला आहे. कार्तिकनं त्याला या चित्रपटासाठी मिळालेली 2 कोटी रुपयांची रक्कम सुद्धा परत केली आहे. कार्तिक याने शाहरुख खान याच्या चित्रपटातून बाहेर पडण्यामागील कारण हे करण जौहर याचा दोस्ताना-2 चित्रपट सारखंच होते. यावेळी कार्तिक यानं चित्रपट साइन करण्यासह कथेवर मान्यता व्यक्त केल्यानंतर स्क्रिप्टमध्ये बदल करण्याचं मागणी केली होती. त्यामुळे आता सुद्धा प्रोडक्शन हाउसला कार्तिक याला चित्रपटातून बाहेर काढावे लागले आहे.

या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक अजय बहल करणार होते. तर शाहरुखचे रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार होती अशा चर्चा होत्या.

दरम्यान, कार्तिक आर्यनकडे सध्या भुलभुलैय्या-2 हा सिनेमा आहे. यात तो कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या एका सिनेमातही कार्तिकची वर्णी लागली आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील लॉकडाऊन शिथिल होणार; मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

 रेल्वेगाडी 110 किमी ताशी वेगानं स्टेशन पार करून गेली; त्यानंतर लगेचच जमीन हादरली अन्…

धक्कादायक! भाचीलाच बंधक बनवून केला बलात्कार

आपल्या प्रेयसीला वाचवण्यासाठी तरूणाने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More