बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….म्हणून करीना कपूरचं नवं पुस्तक प्रकाशित होताच वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. करीना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेचा विषय ठरत असते. नुकतंच तिचं नवं पुस्तक लाँच झालं आहे. हे पुस्तक प्रेगनन्सीवर आधारित आहे. मात्र या पुस्तकावरुन नवा वाद निर्माण झाल्याचं समोर येत आहे.

करीनाच्या नव्या  पुस्तकाचं नाव ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ असून करीनाच्या या पुस्तकाविरोधात ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोर्डचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी सांगितलं आहे.

या पुस्तकात करीनाच्या प्रेग्नंसी दरम्यान करण्यात आलेल्या डाएटवर, व्यायाम, स्टाईलबद्दल सांगण्यात आले आहे. एकंदरीतच करीनानं पुस्तकात तिच्या प्रेग्नंसी दरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. याशिवाय पुस्तकात अभ्यासकांनी दिलेल्या अनेक टिप्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान, करीना कपूरने लिहिलेल्या पुस्तकात ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. या पुस्तकाच्या नावामध्ये बायबल हा उल्लेख केल्याबद्दल एकमताने निषेध करण्यात आला. तसेच तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

 

थोडक्यात बातम्या – 

“तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा”

‘दिलीप कुमार उत्कृष्ठ अभिनेते होते पण…’, नसीरुद्दीन शाह यांंचं मोठं वक्तव्य

“भाजप बहुजन चेहरे वापरतो अन् नंतर बाजूला करतो, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते”

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला प्रविण तरडेंचा पाठिंबा, म्हणाले…

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा पंकजा मुंडेंना टोला

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More