बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कल दाढ आली आहे”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांचं नाव घेत टीका केली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

राज ठाकरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या आश्वासन आठवत आहे. इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कल दाढ आली आहे. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही, असा जोरदार टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

भारतीय जनता पार्टीचा(BJP) लाऊडस्पीकर काल शिवाजी पार्कात वाजत होता. स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आपण याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. शनिवारी मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले, मेट्रोचे उद्घाटन झाले म्हणजेच मुख्यमंत्री काम करत आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुमच्या भोंग्याचे काय करायचे, त्यांच्या भोग्यांचे काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे. सल्लामसलत करण्यासाठी शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात. टोलेजंग माणसांवर आपण कशाला बोलायचं?, काल शिवतीर्थावरील भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. महाराष्ट्राला एकचं कळालं की, अक्कलदाढ उशीरा येते, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

WHOच्या दाव्याने खळबळ, कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटने चिंता वाढली

‘राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…’; चंद्रकांत पाटलांकडून जाहीर कौतुक

“शिवतीर्थावरचा कालचा भोंगा भाजपचा आणि स्क्रिप्टही त्यांचीच”

युक्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर; विकृत अवस्थेत सापडले ‘इतके’ मृतदेह

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More