…म्हणून महेंद्रसिंग धोनी मला आवडतो- सनी लियोनी

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच ‘कुल’ असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असं अभिनेत्री सनी लिओनी हिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

एका क्रिकेटच्या संकेतस्थळाचे उद्धघाटन सनी लियोनी हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला तुझा आवडता क्रिकेटपटू कोण? तेव्हा तिने मला धोनी आवडतो असे उत्तर दिले.

धोनी खूप शांत असून, तो एक ‘फॅमिली मॅन’ आहे. धोनीची मुलगी झिवा ही तर फारच सुंदर आहे. धोनी आणि झिवाचे काही फोटो मी पाहिले असून, ते खूपच सुंदर आहेत असं सनी लियोनीने सांगितलं.

दरम्यान, सनी लियोनी ही सध्या दोन मालिका, एक हिंदी चित्रपट आणि दोन दक्षिण चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….

विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी

-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!

काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे