धोका वाढला! अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू

अहमदनगर | राज्यात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. अशात राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 8 रुग्ण सापडले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

6 रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावरील औषधे सुद्धा कमी आहेत. पुढील काळात याची संख्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे, असं जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांनी सांगितलं.

राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 1 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच म्युकरमायकोसिसबाबत केंद्र सरकारकडे तीन मागण्या केल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत 6 हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला 20 – 20 इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘राजा कायम पण…’; पाहा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

‘या’ भाजप नेत्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केलं तोंडभरून कौतुक

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

तौत्के चक्रीवादाळाचं संकट; NRDF च्या 10 टीम्स ‘या’ भागात तैनात

‘शंभर बॅनरची पीआर मात्रा हेच शिवसेनेचं कर्तृत्व’; अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर हल्लाबो

ahmadnagarcoronaDeathMucormycosisVaccineअहमदनगरकोरोनामृत्यूम्युकरमायकोसिसलस