बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#T20WorldCup | अरे हा भारताचा संघ की मुंबई इंडिअन्सचा, विश्वचषक संघातील इतके खेळाडू मुंबईचे!

मुंबई | आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अंतिम पंधरा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे त्यासोबतच 3 राखीव खेळाडू घेतले आहेत. निवड समितीसमोरही मोठं आव्हान होतं कारण भारतात एकास एक सरस खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचीही गोची झाली असावी, अखेर बीसीसीआयने शिलेदारांची यादी जाहीर केली आहे.

निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे त्यामध्ये आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश आहे. निवड झालेल्यांपैकी मुंबई इंडियन्समधील संघातील, प्रमुख फलंदाज रोहित शर्मा, फंलदाज सुर्यकुमार यादव, फंलदाज, यष्टीरक्षक इशान किशन, अष्टपैलू हार्दिक पांड्या, गोलंदाज राहुल चहर आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. सोशल माध्यमांवरही याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मुंबई पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स संघामधील यष्टीरक्षक ऋषभ पंत, अनुभवी फीरकीपटू रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघही आहेत.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

 

थोडक्यात बातम्या- 

विराटची विकेट घेतलेल्या ‘या’ मिस्ट्री स्पिनरला लॉटरी, थेट भारतीय संघात संधी!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

#T20WorldCup | विराटचा हुकमी एक्का असलेल्या ‘या’ खेळाडूला बीसीसाआयने दिला डच्चू

#T20WorldCup | धोनीचं पुनरागमन! बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय शिलेदारांची यादी जाहीर, बीसीसीआयने केली घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More