बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा”

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लालबाग परिसरात अविघ्नपार्क इमारतीला भयानक आग लागली होती. या आगीमुळं पुन्हा एकदा मुंबईच्या महापालिकेवर विरोधक प्रश्नचिन्हं निर्माण करत आहेत. आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. अशातच मुंबईतील कारभारावरून पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आताही भाजपनं पेडणेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सध्या राज्यात भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये गांजा प्रकरणावरून जोरदार कलगीतूरा रंगलेला आहे. गांजाला हर्बल तंबाखू म्हणणारं सरकार महानगरामधील अग्नीसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांना आगीतून फुफाट्यात लोटण्याखेरीज दुसरे काहीही करू शकत नाही, अशी जळजळीत टीका मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे.

मुंबईतील अग्नीतांडव हा अकार्यक्षमतेचा उच्च कोटीचा नमुना असून या हलगर्जीपणाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी टीकाही देसाई यांनी केली आहे. परिणामी मुंबई महापालिका निवडणुकीआधीच भाजप आणि शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत. मुंबई शहर हे जागतिक आकर्षणाचं केंद्र आहे परिणामी या शहरात इमारती उभारताना दक्षता घेण्याची जबाबदारी ही महापालिकेची असल्याचंही देसाई म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईत झालेल्या या आगीच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा मोठ्या शहरांमधील गगनचुंबी इमारतीतील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वत: वैद्यकिय क्षेत्रातील असूनही मुंबईतील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पेडणेकर यांना अपयश आल्याची टीका भाजपतर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यासह ‘दिवाळी भेट’ही मिळणार

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More