पुणे | 22 डिसेंबर रोजी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक((Mukta Tilak)) आणि पिपंरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) यांचं निधन झालं. त्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.
निवडणुकीत चढाओढ होत राहते त्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी अमाप पैसा खर्च केला जात असल्याची चर्चा होत आहे.आता निवडणूक म्हणल्यावर खर्च होणं साहजिक आहे. प्रचारासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्याचं निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या उमेदवार अर्ज अहवालावरुन समोर आली आहे.
पोटनिवडणुकीचा (by-elections) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये आहे. उमेदवारांना त्याचा रोजचा खर्च निवडणूक अधिकारी कार्यालयात द्यावा लागतो. यामध्ये चहा, न्याहरी, जेवण, कार्यालयाचे भाडे आदींचे दरपत्रक जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला आहे.
कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून 20 फेब्रुवारीपर्यंत तीन लाख 75 हजार इतका खर्च केला आहे. भाजपचे आमदार हेमंत रासने (MLA Hemant Rasane) यांनी आठ लाख 33 हजार तर चिंचवडमध्ये भाजपच्या जगताप यांनी 4 लाख 97 हजार खर्च केला आहे.
राष्ट्रवादीचे काटे यांनी चार लाख 74 हजार रुपये तर दुसरीकडे अपक्ष आमदार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी एक लाख 13 हजार रुपये खर्च केला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत कलाटे यांनी 12 लाख 397 रुपये खर्च केला आहे. दरम्यान, उमेदवारांनी सादर केलेली खर्चाची यादी आणि प्रत्यक्ष केलेला खर्च याची फेरतपासणी केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या