बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावूक

बीड | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या दौऱ्याचा तिसरा पर्व सुरू झाला आहे. 27 सप्टेंबर रोजी जयंत पाटील यांचा दौरा बीडमधील परळी येथे होता. या वेळी तेथील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून बैठकीचं मेळाव्यात रूपांतर झाले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जयंत पाटील परळीमध्ये पोचताच परळीकरांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. परळीकरांचा जल्लोष पाहून जयंत पाटील देखील भावूक झाले. यावर वक्तव्य करत असताना आपल्या लग्नात देखील एवढी मोठी वरात काढली नसल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं आहे.

धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं होतं. अगदी त्याच जल्लोषात काल जयंत पाटील यांचं देखील स्वागत करण्यात आलं होतं. विशेष बाब म्हणजे जोरदार पाऊस सुरू असून देखील गावातील आणि शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, 27 सप्टेंबर रोजी जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात बैठक घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी माझ्या लग्नाची सुद्धा एवढी मोठी वरात कोणी काढली नव्हती, अशी टिप्पणी देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

थोडक्यात बातम्या-

चालकाच्या धाडसाने प्रवाशांचा जीव धोक्यात, पुलावरून जाताना एसटी कोसळली; पाहा व्हिडीओ

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

तळीरामांचे वांदे! लस घेतली तरचं मिळणार दारू; ‘या’ जिल्ह्यात राबवली भन्नाट कल्पना

“संजय राऊतांनी ईडीला तब्बल 55 लाख रूपये दिले, अडसूळांनी राऊतांकडून काहीतरी शिकावं”

RSSवर टीका केल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; न्यायलयाने पाठवली नोटीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More