बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…..म्हणून लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन नवरोबा झाडावर जाऊन बसला

भोपाळ | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाला हरवण्यासाठी अजूनही लसीकरण करणं महत्वाचं आहे. यातच लसीकरण करण्यासाठी अनेकांची टाळाटाळ पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी बातमी सध्या समोर येत आहे.

मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील पाटण कला गावातून ही बातमी समोर येत आहे. कोरोना लसीकरणाबाबत मनात भीती असल्यानं एक तरुण चक्क लसीकरण केंद्राच्या जवळ असलेल्या झाडावर जाऊन बसला. कंवरलाल असं या तरुणाचं नाव आहे.

गावातील कंवरलाल हा लस घ्यायला तयार नव्हता. गावकऱ्यांनी अनेकदा त्याला लस घ्यावी यासाठी आवाहन केलं. मात्र लसीबद्दल मनात भीती असल्यानं त्यानं नकार दिला. यानंतर लोकांनी त्याच्या पत्नीची समजूत काढत लसीकरणासाठी तयार केले आणि तिला लसीकरण केंद्रात नेलं. पत्नी लस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचल्याची माहिती मिळताच पत्नीचे आधार कार्ड घेऊन घराबाहेर पडला आणि झाडावर चढून बसला. गावकऱ्यांनी त्याला अनेक विनंत्या केल्या मात्र तो खाली उतरला नाही.

दरम्यान, लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपेपर्यंत तरुण झाडावरच बसून राहिला. शेवटी लसीकरण केंद्रातील लसी संपल्याची खात्री पटल्यानंतरच तो खाली उतरला. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

’40 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार’

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्लसच्या 21 रुग्णांच्या लसीकरणाबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

प्रेग्नसीनंतर ‘या’ आजारामुळे अनुष्का शर्माने कापले केस

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More