बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळे आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं”

मुंबई | माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्या वक्तव्यावरुन राजकारणात अनेक खलबतं सुरु झाली आहेत. गितेंच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आता ठिणगी पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगली आहे. अशातच आता संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

मला तर सुरुवातीला आनंद झाला होता की संजय राऊत सारखे सांगत असायचे शरद पवार यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं उदाहरण मिळाल्यास मी राजकारण सोडेन. आता त्यांनी खरंच राजकारण सोडावं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

अनंत गितेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी शरद पवार हे देशाचे नेते असल्याचं म्हणत या गोष्टींवर बोलायचं टाळलं. मात्र भाजप नेत्यांनी अनंत गितेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणाच साधला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं ओपन चॅलेंज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. त्यावरुनच आता पाटलांनी राऊतांवर ताशेरे ओढले आहेत. आता यावर राऊत काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना संदर्भात देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर!

भारतात दिल्या जाणाऱ्या ‘या’ लसीला ब्रिटनकडून मान्यता नाहीच!

ओवैसींच्या दिल्लीतील निवासस्थानाची जमावाकडून तोडफोड, 5 जण पोलिसांच्या ताब्यात

तालिबानी सत्तासंघर्ष टोकाला, दोन्ही सर्वोच्च नेेते गायब

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More