बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘घरचे सांगायचे मुलगा डायरेक्टर आहे, म्हणून…’; अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या कार्यक्रमात अजित पवार आले आणि बहार आली नाही असं होत नाही. कधी मिश्किल तर कधी स्फोटक बोलून सभेत रंगत आणण्यात अजित पवार तरबेज आहेत. आताही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.

माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आज झाला. अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. अजित पवारांनी यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नविन संचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मला लग्नाआधी छत्रपती साखर कारखान्यात संधी मिळाली म्हणून माझ्या लग्नाचं सोप झालं. असं अजित पवार म्हणाले आहेत.

आमच्या घरचे सांगायचे मुलगा डायरेक्टर आहे म्हणून पद्मसिंह पाटील यांनी मला त्यांची बहिण दिली, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांनी हा किस्सा सांगताच सभेत हशा पिकला. कारखान्यावर निवडूण आलेल्यामध्ये काहीजण कोरी पाटी आहेत तर काहीजण खूप अनुभवी आहेत. नविन लोकांना शिकता येणार आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार हे सहकारातील मोठं नाव आहे. अजित पवार यांनी आजपर्यंत सहकार क्षेत्रातील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्य आहेत. शेतकरी हा सहकारी कारखान्याचा मालक असतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

मोठी बातमी! सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More