बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप करणारं खळबळजनक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होेता. आता अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

घाडगे, डांगे, सोनु जालन, केतन अशा अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी परमबीर सिंग यांच्याबद्दल येत आहेत. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन सापडणं किंवा मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांच्या बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती.परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर चुका केल्या. त्या माफ करण्यालायक नव्हत्या. म्हणून मी गृहमंत्री असताना परमबीरसिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केली, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

मी एका कार्यक्रमात देखील यासंदर्भात सांगितलं होतं की परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची संशयास्पद भूमिका होती. त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांना आरोप करायचे होते तर पदावर असताना त्यांनी आरोप करायला हवे होते, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सीबीआयने वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा आणि त्यांना महत्त्वाची प्रकरणे हाताळण्यास देण्याचा मुद्दा मर्यादेबाहेर जाऊन एफआयआरमध्ये समाविष्ट केला आहे. न्यायालयानेही मर्यादित तपास करायला सांगितला असतानाही सीबीआयने मर्यादेपलीकडे जाऊन तपास केल्याचा मुद्दा सरकारने याचिकेत उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-  

Shree

कोल्हापुरात पावसाचा कहर, आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा आजची आकडेवारी..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सलग 5 तास कोरोनाबाधीताचा मृतदेह रूग्णालयाबाहेर होता पडून

सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो मग सीटीस्कॅन करावं की नाही?, तात्याराव लहाने म्हणाले….

“बंगालची वाघीण जिंकली म्हणणारे आता मूग गिळून गप्प का आहेत?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More