देश

काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी- कपिल सिब्बल

नवी दिल्ली | निवडणुकींचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असं काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

फक्त बिहारच नव्हे तर देशात ज्याठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत तेथील जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे, असं कपिल सिब्बव म्हणाले. ते ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचं माझ्या कानावर अद्याप आलेलं नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असं पक्षनेतृत्त्वाला वाटत असावं, अशी टीका कपिल सिब्बल यांनी केली आहे.

आपलं कुठे चुकतेय, हे काँग्रेसला पक्के ठाऊक आहे. मात्र त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही. हे असेच सुरु राहिलं तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहली अनुष्काचा कुत्रा; काँग्रेस प्रवक्त्याकडून उल्लेख!

“मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार, मात्र नियंत्रणाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल”

पुणे पुन्हा हादरलं, ‘या’ संघटनेच्या प्रमुखाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं

मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या