बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत”

नवी दिल्ली | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे गेल्या वर्षभरापासून थैमान घातलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात सगळीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात केली आहे. महाभयंकर कोरोना रोगामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतू असं असुनही काही लोक लस घेण्यास नकार देत आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी वक्तव्य केलं आहे.

मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोमवारी 14 जून रोजी ऋषिकेश येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी रावत यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लिम समाजातील लोक सध्या लसीकरणापासून दूर आहेत. त्यांच्या मनामध्ये लसीकरणाबाबत शंका आणि गैरसमज आहेत. ते अजूनही लस घ्यायला घाबरत असल्याचं रावत यांनी म्हटलं आहे.

तसेच रावत यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील लोकांना आवाहनही केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, तुम्ही लस घेतली नाही, तर हा विषाणू नष्ट होणार नाही. लस न घेतल्यामुळे या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकते. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावं. त्याचप्रमाणे देशातील 80 टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होईल, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार का?, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘या’ जिल्ह्यातील नागरिकांचा चिंतेत भर; कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

देशातुन कोरोना हद्दपार; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 75 दिवसांतील सर्वात मोठी घट

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More