बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!

नवी दिल्ली | दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. या धावपळीच्या जीवनात आपलं स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष राहत नाही. त्यामुळे छोटे-मोठे आजार उद्भवले की आपण आवश्यक ती काळजी घेत नाही. यातच मायग्रेनचा त्रास आजकाल सर्वांनाच जाणवायला लागल्याचं पाहायला मिळतंय.

मायग्रेन म्हणजे सतत डोकं दुखणे. मात्र आपण सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. लक्ष न दिल्यामुळे सर्वतः मायग्रेनचे रूग्ण अधिक पाहायला मिळतात. मायग्रेन असेल तर बदाम खाणं टाळलं पाहिजे. बादाम खाल्यानं व्हिटॅमिन ई च्या जास्त प्रमाणामुळं डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येते. म्हणूनच, मायग्रेनच्या रुग्णांनी बदाम खाणं टाळावं.

बदामामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, तसेच त्याचा प्रभावही खूप गरम असतो. अशा स्थितीत गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात जळजळ या सारख्या समस्या निर्माण होतात.

दरम्यान, डोक्याच्या एका बाजूलाच न दुखता संपूर्ण डोके दुखते, झटके अत्यंत कमी वेळासाठी येतात आणि जातात. डोकेदुखी नाहीशी झाल्यावरही पेशंटला मळमळतं, अशक्त वाटतं काहीजणांना प्रकाश, आवाज आणि कुठलेही आजार नकोसे होतात. त्यामुळे शक्यतो बदाम खाण्याचं टाळावं.

थोडक्यात बातम्या –

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेतील गदारोळानंतर राऊतांची टीका

‘मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More