बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून गेले दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले नाहीत’; रोहीत पवारांनी सांगितलं कारण

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची या वाढत्या इंधन दरवाढीमुळे कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या इंधनदरवाढीवरून विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतू गेले दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचं दिसून येत आहे.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महागाईच्या वनव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलीच कोपरखळी मारली आहे.

या संदर्भात त्यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. पण काही का असेना, यामुळं का होईना केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, असंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. 25 दिवस चालणाऱ्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत 8 व्या मिनिटालाच संसदेत गोंधळ सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

“तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये”

मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती करतो, की पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका- बंडातात्या कराडकर

“बकरी ईदनिमित्त कोरोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More