…म्हणून मोदींच्या देहूतील सभेआधी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला पोलिसांची नोटीस
पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा 14 जून रोजी पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापुर्वी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यातच भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविकांत वर्पे यांना नोटीस बजावली आहे.
विटेवरी उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या फोटोपेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा लावल्यामुळे वारकरी सांप्रदायाचा अपमान होत असून भाजपने माफी मागावी, अशी भूमिका रविकांत वर्पे यांनी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविकांत वर्पे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.
दरम्यान, वर्पे हे शरद युवा संवाद दौऱ्यानिमित्त बुलडाण्यामध्ये असून पोलिसांनी दिलेली नोटीस ही एक प्रक्रियेचा भाग आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे जोपर्यंत वारकरी सांप्रदायाची अधिकृतपणे माफी मागत नाहीत तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असेल, असं रविकांत वर्पे यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा आम्हाला आमचा विठ्ठल सदैव मोठा असेल, असंही रविकांत वर्पे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती होणार?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाल्या…
‘…तर मला आणि भाजपला मैदानात उतरावं लागेल’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
“राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”
Comments are closed.