बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी प्रणव मराठे यांना न्यायालयानं 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठे ज्वेलर्स हे पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स आहेत. सध्या त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना कोथरुड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे आता प्रणव मराठे यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत राहवं लागणार आहे.

59 वर्षाच्या शुभांगी काटे यांनी आरोप करत म्हटलं आहे की, मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणुुक केल्यानंतर हे सोने, चांदी आणि मुळ रकमेवर चांगला परतवा मिळेल, असं सांगत आमिष दाखवत होते. त्यांच्या बोलण्यात येऊन लोक मराठे ज्वेलर्सकडे पैसे गुंतवायचे. गुंतवणुकीच्या बऱ्याच दिवसांनीही पैसे न मिळाल्यानं याबात त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र मला कसलीही माहिती न दिल्यानं मी तक्रार दाखल केली.

दरम्यान, सहायक सरकारी वकील एम.बी वाडेकर यांनी म्हटलं की, आरोपीनं गुंतवणूकदारांची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास केला असता 18 ठेवीदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

…म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले चक्क कंडोम!

“महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं”

धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी

‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More