Top News देश

…म्हणून काँग्रेस नेते राहूल गांधी ‘ती’ बैठक अर्धवट सोडून गेले

नवी दिल्ली | लष्करी जवानांचा ड्रेस कसा असावा यावर संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीने अधिक काळ चर्चा करून वेळ वाया घालवला, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी ती बैठक अर्धवट सोडून गेले.

बुधवारी म्हणजेच 16 डिसेंबर रोजी संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या जवानांबद्दलचा मुद्दा राहुल गांधींना मांडायचा होता. मात्र त्याला संरक्षणविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार जुआल ओराम यांनी परवानगी दिली नाही.

संरक्षणविषयक संसदीय समितीमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा झाली पाहिजे, असंही राहुल गांधींनी बैठकी दरम्यान म्हटलं.

दरम्यान, राहुल गांधीप्रमाणेच संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये लष्करी जवानांचा ड्रेस कसा असावा, यावरच समितीने अधिक वेळ वाया घालावला असल्याचा आरोप राजीव सातव आणि रेवनाथ रेड्डी यांनीही केला आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर

तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार

लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या