Top News

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

पुणे | रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्यांना आता आधार क्रमांक लिंक करणं बंधनकारक करण्यात आलंय. जर रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला नाही तर 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद करण्यात येणारे.

शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्य घेणाऱ्यांना आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्नयोजनेतील रेशनकार्डातील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर तसंच आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्नयोजनेत एकूण 13,32,871 लाभार्थी आहेत. यापैकी सुमारे तीन लाख पेक्षा अधिक लाभार्थीचे आधार लिंक झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

‘रिया चक्रवर्ती माझी..’; रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं त्या फोटोबाबत दिलं स्पष्टीकरण, म्हणाला….

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी उर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या