Top News जळगाव महाराष्ट्र

…म्हणून वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसेही भाजपला ठोकणार रामराम!

जळगाव | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर वडिलांच्या पाठोपाठ एकनाथ खडसेंची मुलगी राेहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

भाजपने मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतर देखील मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला. त्याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. तसेच मी देखील सक्रीय राजकारणात असून आता भाजपला राजीनामा देऊन राष्ट्रवादीचं काम करणार असल्याचं रोहिणी यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे पक्षनिष्ठेने पक्षाचे काम केले आहे. नाथाभाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, पण त्यांना सतत दुय्यम वागणूक देण्यात आली, असंही रोहिणी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसेंचा 23 ऑक्टोबर म्हणजेच आज 2 वाजता अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा!

मनसे नेते अमित ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, आरोपी गजाआड

‘…त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखं काहीच नव्हतं’; भाषणानंतर शिवसेनेचा मोदींना टोला

आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या