मुंबई | पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारनं बॉलीवूड शोमॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित घरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासह फाळणीपूर्वीची अनेक घरं खरेदी करून पाकिस्तान सरकारला राष्ट्रीय वारसा घोषित करायचा आहे. पाकिस्तानमधील सरकारच्या या निर्णयाचं दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी कौतुक केलं आहे.
जेव्हा जेव्हा पाकिस्तान सरकारनं दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित हवेलीला संग्रहालयात रूपांतरित करण्याचा विचार केला तेव्हा मला खूप आनंद झाला. सरकारच्या या निर्णयाचे मी नेहमीच कौतुक करते. या वेळी हे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया सायरा बानो यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलाताना दिली.
महत्वाच्या बातम्या-
‘…अन् भाजपचं तोंड काळं झालं’; काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका
मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!
“अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी”
दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा…- चंद्रकांत पाटील