बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….म्हणून ओटीटीवरील बिग बाॅससाठी सलमान खानचा नकार

मुंबई | छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा सलमान खान सांभाळताना दिसतो. कार्यक्रमात सुरुवातीच्या क्षणापासून रंगत आणत हा भाईजान ज्यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या स्पर्धक सेलिब्रिटींची शाळा घेतो, त्यांना धारेवर धरतो तेव्हाही त्याचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. मात्र आता ‘बिग बॉस 15’ पर्वाचे सूत्रसंचालन करण्यास सलमाननं स्पष्ट नकार दिल्याचं समजतय.

‘बिग बॉस 15’ च्या तयारीला सुरुवात झाली आहे. चाहते देखील शो ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावेळी हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. सहा आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टीव्हीवरून प्रसारित होणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं आहे.

आगामी सिनेमांमध्ये व्यस्त असल्यानं सलमान खान ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये दिसणार नाही. त्याच्या ऐवजी एक नवा होस्ट बिग बॉसला मिळणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्याच्या गैरहजेरीत कोण सुत्रसंचालन करेल? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला ओटीटीवर शो चे सुत्रसंचालन करणार आहे, असा अंदाज आहे. त्याच्याशिवाय फराह खानचे नाव देखील होस्टिंगसाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर यंदाच्या सीजनमध्ये शो मध्ये नवे ट्विस्ट जोडण्यात आले असून शो अधिकच मनोरंजक होईल, अशी आशा आहे.

थोडक्यात बातम्या – 

गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना प्रशासनाचा दणका

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

‘महाविकास आघाडी सरकार पडणार नाही’; चंद्रकांत पाटलांंचं आचंबित करणार वक्तव्य

“वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल”

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More