बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड याचं नाव चर्चेत!

मुंबई | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दिपाली यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्याच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. हे प्रकरण तापलेलं असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव घेतलं जात आहे.

दिपाली चव्हाण यांनी आपले वरिष्ठ अधिकारी शिवकुमार छळ करत असल्याची तक्रार खासदार रवी राणा यांची भेट घेऊन केली होती. यानंतर राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र पाठवत दिपाली यांच्या बदलीची शिफारस केल्याचं समजत आहे. मात्र याकडे संजय राठोडांनी या बदलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना संजय राठोडांनी सर्व आरोप फेटाळले असून याबाबतचा कोणताही पत्रव्यवहार आपल्या निदर्शनास आला नसल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे.

वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. त्यांनी पत्रात लिहिलेल्या बाबीही गंभीर आहेत. शिवकुमार यांच्या आधीच्या कामाच्या ठिकाणीही अशा तक्रारी होत्या. त्यावेळी मी त्यांची बदली करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या प्रकरणातही मी नक्कीच पाठपुरावा करेल, असं संजय राठोड यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सरकारने या प्रकरणात विनोद शिवकुमार यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर प्रधान मुख्य वनरक्षक एम. एस. रेड्डी यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. तर एम. एस. रेड्डी यांची इतर पदावर बदली करण्यात येणार आहे. तर एम. एस. रेड्डी यांच्या जागी प्रविण चव्हाण यांची मुख्य वनरक्षकपदी वर्णी लावण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-  

ठाकरे सरकारने सांगितलेला ‘हा’ नवा नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची स्थिती भीषण, अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

‘सचिन सावंतांना उत्तर द्यायला भाजपचे ‘हे’ नेते खंबीर’; फडणवीसांनी उडवली खिल्ली

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदी

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More