बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून स्नेहा दुबे यांनी न्यूज अॅंकर अंजना कश्यपला बाहेरचा रस्ता दाखवला!

नवी दिल्ली | आयएफएस अधिकारी स्नेहा दुबे यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतपधान इम्रान खान यांना खडेबोल सुवावले आहेत. त्यांनी सर्वसमक्ष पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला आहे. यामुळे सर्वत्र स्नेहा दुबे यांची चर्चा सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरीका दौरा कव्हर करण्यासाठी गेलेल्या आज तकच्या न्यूज अॅंकर अंजना ओम कश्यप स्नेहा दुबे यांची मुलाखत घेण्यासाठी पोहोचल्या. परंतु दुबे यांनी कश्यप यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

अंजना ओम कश्यप संध्याकाळचे बुलेटीन लाईव्ह करत थेट स्नेहा दुबे यांच्या रुममध्ये शिरल्या. यानंतर त्यांनी स्नेहा दुबे यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. परंतु स्नेहा दुबे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला आणि कश्यप यांना बाहेर जाण्यास सांगितले.

मला जे काही बोलायचं होतं ते मी योग्य ठिकाणी मांडलं आहे, असं यावेळी दुबे यांनी म्हटलं आहे. यानंतर दुबे यांनी कश्यप यांना बाहेर जाण्याचा इशारा केला. हा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, रोशन राय यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. TRP साठी स्नेहा दुबेंचा वापर करु पाहणाऱ्या अंजना कश्यप यांंना दुबेंनी बाहेरचा रस्ता दाखवल्याची टीका नेटकरी करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता पण…- छगन भुजबळ

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More